यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचा श्रीनिवास वाडकर यांचे सीईटी परीक्षेत नेत्रदीपक यश
यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचा श्रीनिवास वाडकर यांचे सीईटी परीक्षेत नेत्रदीपक यश
अहमदपूर ( गोविंद काळे ) मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सीईटी परीक्षेत यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रीनिवास राजाभाऊ वाडकर याला 98.61 परसेंटाइल आणि नीट परीक्षेत 547 गुण मिळवून तो महाविद्यालयामध्ये सर्वप्रथम राहिलेला आहे.
या नेत्र दीपक यशाबद्दल त्याचे प्राचार्य गजानन शिंदे, उपप्राचार्य प्रा .मुजमील सय्यद यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यां नेत्र दीपक यशाबद्दल त्यांचे टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव डी.बी.लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके, सहसचिव प्रा. डॉ. सुनिता ताई चवळे, उपमुख्याध्यापक राजकुमार गोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्यवाढ, राम तत्तापुरे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
