अहमदपूर इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षपदी विजया भुसारे तर सचिव पदी रेखा बालुरे यांची निवड
अहमदपूर इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षपदी विजया भुसारे तर सचिव पदी रेखा बालुरे यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील इन्नर व्हील क्लबच्या च्या 2024-25 या वर्षाच्या अध्यक्षपदी विजयाताई गजानन भुसारे-रोडगे यांची तर सचिव पदी रेखा बस्वराज बालुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्षा पूजा रेड्डी, कोषाध्यक्षा सुरेखा उगिले,ISO सुनंदा पदातुरे, सहसचिव कलावती भातांब्रे, संपादक आशा तत्तापुरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन अध्यक्षा विजया रोडगे म्हणाल्या की, डिस्ट्रिक चेअरमन डॉ.शोभना पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या वर्षात महिलांसाठी आरोग्य विषयक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरण संतुलन, अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव अभियान,जल बचाव अभियान, युवकांच्या व्यसनमुक्तीसाठी सकारात्मक प्रयत्न करणार असून विविध अभिनव उपक्रम सर्व पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या सहकार्याने घेणार असल्याचे सांगितले. या नूतन कार्यकारणीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
