सिध्दी शुगर’ येथे वृक्षारोपन
सिध्दी शुगर' येथे वृक्षारोपन
अहमदपूर (गोविंद काळे) : महेश नगर, उजना येथे सिध्दी शुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त कारखाना स्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब जाधव व माजी सरपंच तथा सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता साहेवराव जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणामध्ये जांभुळ (वहाडोली) व चिक्कु (कालीपत्ती) आदी ५२ रोपांचे वृक्षारोपण करुन वाढ-दिवस साजरा करण्यात आला.यावेळी कारखान्याचे व्हाईस अध्यक्ष पी.जी. होनराव, जनरल मॅनेजर एस.आर. पिसाळ, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टिलरी) एस.बी. शिंदे, कंपनी सेकेटरी एस.टी. सावंत, बँकस्थायी तपासणी अधिकारी व्ही. पी. आकुस्कर, डिस्टीलरी व्यवस्थापक सागर जाधव, मुख्याधिकारी लेखापा एल.आर.पाटील,
चिफ फायनांस ऑफिसर ए.एस. पाटील, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, सिव्हील इंजिनिअर साळुंके, डे. चिफ इंजिनिअर मुलानी, डे. चिफ इंजिनिअर ढगे, इले. इंजिनिअर परघणे, डे. चिफ केमीस्ट शामराव लकडे, परचेस ऑफिसर धनराज चव्हाण, हेडटाईम किपर धनंजय टि- ळक, स्टोअरकिपर सिद्धेश्वर स्वामी, पर्यावरण अधिकारी दिलीप ताटे, दुग्धसंकलन अधिकारी संदीप पाटील, गार्डन सुपरवायझर हरिभाऊ पांचाळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
