महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलार लोकार्पण
लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या एक अभ्यासू खासदार म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे, संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमाने लातूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मुरुड जिल्हा परिषद गटातील करकट्टा ता. लातूर गणात पंचायत समिती स्तर 15 वित्त आयोग निधीतून पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री तवले यांनी करकटा येथील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीवर सोलार प्रकल्प उभारण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला होता, संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे – पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सदरील सोलर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा उपप्रमुख बी एन डोंगरे हे होते. या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण सोहळा करण्यात आला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भक्तावर बागवान (तालुका अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर), श्रीकांत मगर (तालुका अध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी लातूर), नारायण नागरगोजे (जिल्हा सचिव- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर), पुरुषोत्तम पाटील (सचिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर), निशांत वाघमारे ( प्रदेश सचिव- राष्ट्रवादी युवक काँग्रेस), परमेश्वर पवार (प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी युवक काँग्रेस), समाधान गिरी, श्री दत्ता गोरे हे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल शिंदे (माजी सरपंच – करकट्टा) बाळासाहेब शिंदे (माजी सरपंच – करकट्टा) , पांडुरंग मरे (माजी सरपंच- करकट्टा ), शिवाजी मरे (ग्रामपंचायत सदस्य- करकट्टा), जनक इंगळे (ग्रामपंचायत सदस्य- करकटा), परसराम गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य- करकट्टा), महादेव शिंदे, शैलेंद्र आल्टे, बळीराम गोरे, राजाभाऊ इंगळे, माणिकराव दनके, शिवाजी फेरे, वेंकटेश शिंदे, संतोष गायकवाड, राम गोरे, धनराज गोरे, नाना ढोकळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पाणीपुरवठा योजनेवर सोलार प्रकल्प राबविल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देता येईल, पाणी उपलब्ध असून सुद्धा ग्रामीण भागातील ग्रामपंचायतचे उत्पन्नाचे स्रोत कमी असल्यामुळे वेळोवेळी विद्युत बिल न भरल्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडले जाते, त्यामुळे ग्रामीण भागातील खास करून महिलांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. सोलार प्रकल्पामुळे दिवसभरात ग्रामपंचायतला गावाला पाणी उपलब्ध करून देता येईल, व त्यामुळे नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय होईल, या उद्देशाने सदरील सोलार प्रकल्प उभारण्यात आला आहे. या लोकार्पण सोहळ्याचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हा लक्ष्मण तवले हे होते.
