अहमदपूर रोटेट तर्फे डॉक्टर्स डे साजरा

0
अहमदपूर रोटेट तर्फे डॉक्टर्स डे साजरा

अहमदपूर रोटेट तर्फे डॉक्टर्स डे साजरा

अहमदपूर ( गोविंद काळे ) : अहमदपूर रोटरी क्लब तर्फे दिनांक एक जुलै डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात आला. येथील माऊली हॉस्पिटल येथे
शहरातील सर्व सन्माननीय डॉक्टरांचा रोटरी क्लब अहमदपूर तर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर्स वर्षभर अहमदपूर शहराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी ही सेवा देतात याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी शहरातील डॉक्टर पांडुरंग कदम, डॉक्टर चंद्रकांत उगीले ,डॉक्टर विष्णु पदातुरे ,डॉक्टर सतीश पेड डॉक्टर रामेश्वर चामले ,डॉक्टर पलमटे , डॉक्टर रेचेवाडे आदींची उपस्थिती होती रोटरी क्लब तर्फे नूतन अध्यक्ष राजीव कल्याणी, सचिव अनिल फुलारी यांनी सन्माननीय डॉक्टरांचा सत्कार केला. यावेळी रोटरी क्लबचे क्लब ट्रेनर मोहीब कादरी, ज्येष्ठ सदस्य महेंद्र खंडागळे, मावळते अध्यक्ष शिवशंकर पाटील , कपिल बिराजदार, अनिल चवळे, गोपाळ पटेल, धनंजय कोत्तावार आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित रुग्णांचे तपासणी करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!