महात्मा फुले महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
महात्मा फुले महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन ‘ म्हणून साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे हे होते तर प्रो. डॉ अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी व आभार एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
