मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे रुद्धा येथे एक हजार पाचशे वृक्ष लागवड

0
मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे रुद्धा येथे एक हजार पाचशे वृक्ष लागवड

मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे रुद्धा येथे एक हजार पाचशे वृक्ष लागवड

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथे हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 1500 वृक्ष लागवडीचा कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, तर प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, पालेवाड साहेब तहसीलदार अहमदपूर, अमोल कुमार आंदेलवाड साहेब गट विकास अधिकारी अहमदपूर, अशोक सोळुंके कृषी विस्तार अधिकारी, किरण परतवाघ कृषी सहाय्यक,होनराव सर वनरक्षक, शिवराज कांबळे तलाठी, अजित सिंग, डॉ.धुळे, मुख्याध्यपिका साके मॅडम, संदीप माने, श्रीराम कांगणे, मंगेश चव्हाण उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन कारण्यात आले.

यावेळी बोलताना गणेश हाके यांनी हे गाव माझे आहे ग्रामपंचायत नी जो निर्णय घेतला हरित गाव करण्याचा यांचा मला अभिमान आहे म्हणून मी यामधील निम्मे झाडे दत्तक घेऊन संगोपन करेल असा विश्वास गावकऱ्यांना दिला. यानंतर अशोक केंद्रे बोलत असताना त्यांनी सुद्धा निम्मी झाडे मी दत्तक घेऊन त्यांचे पूर्ण संगोपनाची जबाबदारी मी घेईल असे सांगितले. या ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित उपक्रमासाठी उपस्थित तहसीलदार साहेब यांनी शुभेच्छा दिल्या तसेच गट विकास अधिकारी साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाची तोंड भरून स्तुती केली. सर्व उपस्थित कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी होईल त्या पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी श्रमदान करण्यासाठी साई गणेश मिल्ट्री फाउंडेशनचे जवान व बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच गजानन चंदेवाड ग्रामसेवक किशोर सर्केलवाड,उपसरपंच नाथराव केंद्रे, विजय केंद्रे ग्रा प सदस्य, कविता सुरनर ग्रा प सदस्य, जयश्री केंद्रे ग्रा प सदस्य, वेणूबाई केंद्रे ग्रा प सदस्य, खोब्राजी केंद्रे व्हॉइस चेअरमन,दादाराव होळंबे संचालक वि का से स सोसायटी, बलभीम देवकत्ते, बालाजी केंद्रे, अच्युत शिंदे,मधुकर नागरगोजे, पिराजी सुरनर,गोविंद बदने, गोविंद केंद्रे, पांडुरंग नागरगोजे, श्याम गित्ते, मयूर केंद्रे, माधव होळंबे,सुभाष केंद्रे, गुणाजी केंद्रे, सचिन केंद्रे आदी गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच नाथराव केंद्रे यांनी तर सूत्रसंचालन सतीश केंद्रे यांनी केले व आभार सरपंच गजानन चंदेवाड यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!