आ. अमित देशमुख यांची बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल संबंधितावर कारवाई करा – राष्ट्रीय दलित अधिकार मंचची मागणी

0
आ. अमित देशमुख यांची बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल संबंधितावर कारवाई करा - राष्ट्रीय दलित अधिकार मंचची मागणी

आ. अमित देशमुख यांची बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल संबंधितावर कारवाई करा - राष्ट्रीय दलित अधिकार मंचची मागणी

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये, “कोण आला रे कोण आला? अमित भैया चा बाप आला” अशा पद्धतीच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येत निषेध नोंदवला आहे. या संदर्भात राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा युवकांचे हृदय सम्राट आ. अमित भैया देशमुख यांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. असा इशारा देताना चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदरील तक्रारीमध्ये श्रीराम प्राथमिक आश्रम शाळा येथे शिक्षक असलेले चंद्रशेखर अशोकराव पाटील व बाळासाहेब मरलापल्ले आणि त्यांचे चार पाच कार्यकर्ते यांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. सदरील तक्रार पत्रावर राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या सचिव उषाताई कांबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे शहराध्यक्ष मुक्रम जागीरदार, मोहसीन बागवान शेख, युवक काँग्रेसचे श्रीनिवास एकुरकेकर, बंटी कसबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शेख महबूब शेरफुद्दीन, बिपिन जाधव, माधव कांबळे, दत्ता सुरनर, संतोष बिरादार, आदर्श पिंपरे, कनिष्क शिंदे, सद्दाम बागवान, अमोल घुमाडे, नामदेव भोसले, धनाजी बनसोडे, बबन धनबा, गजानन सताळकर, शफी कुरेशी, विवेक जाधव, गौतम पिंपरे इत्यादीचा नामउल्लेख व स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!