डॉक्टरांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करावे – राज योगिनी छाया बहिंजी यांचे प्रतिपादन
डॉक्टरांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करावे - राज योगिनी छाया बहिंजी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : आज सबंध देशांमध्ये सगळीकडे स्वैराचार माजलेला असताना केवळ भारतीय समाजामध्ये देवानंतर ईश्वराचे रूप डॉक्टरांच्या मध्ये पाहिले जाते. त्यामुळे समाजातील डॉक्टरांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करावे असे आग्रही प्रतिपादन ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रमुख राजयोगिनी छाया बहिण जी यांनी केले.
त्या दिनांक एक रोजी डॉक्टर पाटील हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर च्या सभागृहामध्ये इनरव्हील क्लबच्या वतीने आयोजित डॉक्टर डेच्या निमित्ताने डॉक्टरांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनर्विल क्लबच्या अध्यक्षा विजया रोडगे भुसारे होत्या. व्यासपीठावर प्राचार्य रेखाताई तरडे ,सचिव रेखा बाळूरे, डॉक्टर नेहा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी इनरव्हील क्लब च्या वतीने शहरातील डॉक्टरांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्ट अंजली उगिले, डॉक्टर वर्षा भोसले, डॉक्टर पल्लवी कदम यांचे मनोगत पर भाषणे झाले.
अध्यक्षीय समारोप विजया रोडगे भुसारे यांच्या भाषणाने झाला. या सोहळ्याला संगीता खंडागळे, शितल मालू, सविता भुतडा, पुजा रेड्डी, सुनंदा पदातुरे, डॉक्टर भाग्यश्री यलमटे, डॉक्टर सुचिता कापसे, डॉक्टर संजीवनी हेरकर, माधुरी जोशी, स्नेहा पोकर्णा, दर्शना हेंगणे, प्रतिभा नीला यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सदस्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलावती भातंबरे यांनी तर आभार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येणार इनरव्हील क्लब आणि पाटील हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
