अहमदपूरात पंढरपूर पायीदिंडीत जाणाऱ्या चारशे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार

0
अहमदपूरात पंढरपूर पायीदिंडीत जाणाऱ्या चारशे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार

अहमदपूरात पंढरपूर पायीदिंडीत जाणाऱ्या चारशे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार

अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी पार्ट येथे कंधार ते पंढरपूर जाणाऱ्या श्री संत साधू महाराज संस्थान कंधार या पायी दिंडीतील जवळपास 400 पेक्षा जास्त वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर रोटरी क्लब अहमदपूर ,तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आले.

यावेळी या शिबिरात 400 पेक्षा जास्त वारकऱ्यांची तज्ञ डॉक्टर च्या मार्फत तपासणी करण्यात येऊन. त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या व गरजेनुसार त्यांना औषध ,गोळ्या ,इंजेक्शन देण्यात आले.

या शिबिराच्या आयोजनासाठी रोटरीचे अध्यक्ष राजीव कल्याणे ,सचिव अनिल फुलारी व प्रकल्प प्रमुख धनंजय कोत्तावार यांनी विशेष प्रयत्न केले.

या दिंडीचे श्री संत साधू महाराज हे गेले 50 वर्ष झाले वारीत सहभागी होत असल्याबद्दल रोटरी क्लब तर्फे यावेळी त्यांचा सत्कार ही करण्यात आला.

या वैद्यकीय शिबिरासाठी अहमदपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर पांडुरंग कदम, डॉक्टर चंद्रकांत उगीले ,डॉक्टर राजेश्वर स्वामी, डॉक्टर निलेश मजगे, डॉक्टर शिवप्रकाश हेंगणे
डॉक्टर शिवप्रसाद निजवंते, डॉक्टर अतुल खडके, डॉक्टर गजानन दोमकोंडवार, डॉक्टर वैभव रेड्डी यांनी आपली सेवा दिली.
या शिबिरासाठी तालुक्यातील डॉक्टर सह मेडिकल असोसिएशनचे संगमेश्वर नीला, धनंजय कोत्तावार ,गजानन परांडे संगमेश्वर मल्लीशे, वैभव लव्हराळे ,भोसीकर भोसले आदींनीही आपली वैद्यकीय सेवा दिली व औषधोपचार केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी रोटरी क्लबचे राजीव कल्याणे, अनिल फुलारी , प्रोजेक्ट चेअरमन धनंजय कोत्तावार ,महेंद्र खंडागळे, कपिल बिरादार, संजय गोटमवाड , नरसिंग चिल्कावार , गोपाल पटेल, द मा माने ,माधव वलसे, प्राध्यापक वलसे , राहुल घाटोळ ,श्रीराम कलमे
ज्ञानोबा भोसले ,यांच्यासह आर्य वैश्य समाजातील सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!