वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
वसंतराव नाईक यांना अभिवादन

वसंतराव नाईक यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची जयंती काल कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला. अहमदपूर येथील टेंभुर्णी रोडवरील वसंतराव नाईक चौकामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लोकनेते व विकास महर्षी बाळासाहेब जाधव यांच्या शुभ हस्ते आणि माजी आमदार माननीय बब्रूवानजी खंदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतरावजी नाईक यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकासचे तालुका संयोजक बालाजी चव्हाण कवी गणेश चव्हाण, वसंतराव नाईक चौक कमिटीचे अध्यक्ष एस आर राठोड, अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जी के चव्हाण. बंजारा समाज परिवर्तन अभियान जिल्हाध्यक्ष नाथराव राठोड, प्राध्यापक भगवान अमलापुरे, नपचे माजी गटप्रमुख प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, बाबुभाई रुईकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस हरिदास तमेवर, युवा नेते अमित भाऊ रेड्डी, विकास सोसायटी रुईचे उपाध्यक्ष चंद्रकांत राठोड, पंढरी मामा वाघमारे, प्रदीप चव्हाण, रामानंद मुंडे, या खूब शेख प्रदीप चव्हाण व्यंकट मुंडे अक्षय कदम अमोल राठोड एन डी राठोड यांनी सुद्धा वसंतरावजी नाईक यांच्या फोटो पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
अभिवादनानंतर वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोकसेवा संस्था आणि छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप मार्फत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
लोकनेते बाळासाहेब जाधव यांनी वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या
अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री गोपाळ चव्हाण, माजी आमदार माननीय बब्रुवान खंदारे साहेब, प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, युवा नेते अमित भाऊ रेड्डी यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली.
अभिवादन सभेचे सूत्रसंचालन बालाजी चव्हाण यांनी केले तर आभार चंद्रकांत राठोड यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!