पंचायत समिती अहमदपूर येथे कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा संपन्न
पंचायत समिती अहमदपूर येथे कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. याचे औचित्य साधून पंचायत समिती अहमदपूरने कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. कृतिशील शेतकरी आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री राजकुमार शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मेळाव्याच्या प्रारंभीला मेळाव्याचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथीच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर कृषी विभाग पंचायत समिती अहमदपूरच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे व अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष श्री एन डी राठोड आणि अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री जी के चव्हाण यांनी मेळाव्यास आलेल्या महिला आणि पुरुष यांना वसंतरावजी नाईक यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय अमोल अंदिलवाड साहेब आणि पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी श्री सचिन बावगे यांनी कृषी खात्याच्या विविध योजनेबद्दल आणि त्याच्या वापराबद्दल विविध बी बियाणे आणि सेंद्रिय शेती बद्दल, शेती अवजाराबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली.
हा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी कृषी अधिकारी श्री बी के जाधव श्री यशपाल सातपुते, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री शैलेश जोशी, मंडळ कृषी अधिकारी संदीप आयनुले, प्रसाद गायकवाड,
कृषी विस्तार अधिकारी श्री एच बी मुरुडकर, एच एम केंद्रे, विस्तार अधिकारी श्री साचणे यांनी खूप परीश्रम घेतले.
या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविलेल्या आणि शासनाकडून पुरस्कार मिळविलेल्या अनेक कृतिशील शेतकरी आणि महिला गटांचे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्री राजकुमार शिंदे यांनी वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातला चार कृषी विद्यापीठ देऊन अनेक कल्याणकारी योजना दिल्याबद्दल वसंतरावजी नाईक यांच्या कार्याचे कौतुक केले, वसंतराव नाईक यांचा कार्यकाल संपल्यानंतरही गेली साठ वर्ष महाराष्ट्र शासन त्या योजना इमाने ईदबा रे राबवत असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे ही आभार मानले
कार्यक्रमाचे संचालन भारतीय एम एस यांनी केले तर आभार राजू कदम रोकडा सावरगावकर यांनी मानले.
