कृषि दिन, गुणगौरव सत्कार समारंभ
कृषि दिन, गुणगौरव सत्कार समारंभ
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांच्या वतीने कृषि दिन, गुणगौरव सत्कार समारंभ पंचायत समिती सभागृह अहमदपूर येथे साजरा करण्यात आला.
१ जुलै रोजी हरितक्रांतीचेे जनक कै. माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिन कार्यक्रम सम्पंन झाला या वेळी अमोलकुमार अंदेलवाड गट विकास अधिकारी अहमदपूर यांनी पंचायत समिती मार्फत राबवले जाणारे उपक्रम,योजना व विकासात्मक कामे,वृक्ष लागवड बाबत माहिती दिली सचिन बावगे तालुका कृषी अधिकारी अहमदपूर यांनी महाडीबीटी, वीमा भरणे, मनरेगा योजना,विस्तार कार्य या बाबत माहिती दिली, एच मुरुडकर कृषि विस्तार अधिकारी पं.स. यांनी सेंद्रिय शेती बाबत महत्व सांगितले एन डी राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याची उजळणी करुन त्यांच्या कारकिर्रद बाबत महिती दिली मागील हंगामात शेतीमध्ये अधिक पिकांचे उत्पादन घेणारे आणि दुग्ध व्यवसायात यशस्वी भरारी करणारे शेतकरी श्री राजकुमार शिंदे खानापूर, किरण पाटील अंधोरी, भास्कर भुरे किनीकद्दू, दिपक मनोरे सावरगाव थोट, ज्ञानोबा गुरुडे नांदुरा बु , शिवकुमार कदम भुतेकरवाडी, राहुबाई चापटे हदोळती, मनीषा सांगळे हंगेवडी, छबुबाई सांगळे मांडणी, राधाबाई पेड तीर्थ या शेतकरी बांधवांचा गुणगौरव सत्कार मान्यवरांचे हस्ते झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार शिंदे प्रगतशील शेतकरी,पोलिस पाटील खानापूर यांनी कृषि विभागाच्या योजना शेतकरी बांधवांनी घ्यावीत आणी फळबाग लागवड करुन अधिक उत्पादन घ्यावे असे सांगितले या कार्यक्रमास उपस्थिती किशन ईश्वर पाटिल कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अहमदपूर, जि के चव्हाण राष्ट्रिय अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा समाज, भगवान तवर मंडळ कृषी अधिकारी,बि के जाधव,यशपाल सातपुते कृ.अधिकारी, अटुळे साहेब कृषि पर्यवेक्षक, जी आर एनलवार विस्तार अधिकारी,राख साहेब तालुका व्यवस्थापक उमेद आणि तालुक्यातील महीला बचत गट, नैसर्गिक उत्पादक शेतकरी गट महीला सदस्या,कृषि कन्या,उपस्थित होते यांना परसबागेत लागवड करण्यासाठी भाजीपाला बियाणे दिले या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य वासुदेव कुलकर्णी, बीटीएम आत्मा विजय पूरी यांचे सहकार्य झाले,भारती मुरलीधर कृषि सहाय्यक आभार प्रदर्शन सूत्र संचालन यांनी केले.
