अभाविपच्या शहर अध्यक्षपदी प्रा. डॉ. गौरव जेवळीकर तर शहरमंत्री आदित्य पाटील

0
अभाविपच्या शहर अध्यक्षपदी प्रा. डॉ. गौरव जेवळीकर तर शहरमंत्री आदित्य पाटील

अभाविपच्या शहर अध्यक्षपदी प्रा. डॉ. गौरव जेवळीकर तर शहरमंत्री आदित्य पाटील

उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शहराची वर्ष २०२४-२५ ची नूतन कार्यकारिणी लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय, उदगीर येथे लातूर विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषणा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शहर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. गौरव जेवळीकर व शहरमंत्री म्हणून आदित्य पाटील यांची निवड करण्यात आली.

अभाविप उदगीर शहर आयोजित उदय नव छात्र नेतृत्वाचा या कार्यक्रमामध्ये उदगीर शहराची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अभाविप उदगीर जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. किरण गुट्टे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत वर्ष २०२३-२४ ची शहर कार्यकारिणी विसर्जित केली. व नवनिर्वाचित शहर कार्यकारिणी घोषित केली. तसेच विविध आयाम व गतीविधी अंतर्गत कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली. यावेळी अभाविप लातूर विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, उदगीर जिल्हा प्रमुख प्रा. डॉ.किरण गुट्टे, उदगीर जिल्हा संयोजक अदिनाथ मिरकले व विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!