इनरव्हील क्लबच्या वतीने हत्ती बेट येथे १०१ वृक्षारोपण
इनरव्हील क्लबच्या वतीने हत्ती बेट येथे १०१ वृक्षारोपण
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील देवर्जन येथील हत्ती बेट या पर्यटन स्थळी इनरव्हील क्लबच्या वतीने १०१ झाडे लावण्यात आली.सतत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण हा हेतू साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे आणि ती जगवणे ही काळाची गरज आहे. इनरव्हील क्लब हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला संघटन असून,हे या क्लबचे शतकोत्तर १०१ वर्षं चालू आहे. हा या वर्षाचा पहिलाच प्रोजेक्ट म्हणून १०१ झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण केला, असे मत इनरव्हीलच्या नुतन अध्यक्षा व प्रोजेक्ट प्रमुख सौ. मानसी चन्नावार यांनी व्यक्त केले.या उपक्रमासाठी राम चन्नावार व व्हि एस कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.या वेळी क्लबच्या सचिव सौ. पल्लवी मुक्कावार तसेच इसी सदस्य व सर्व इनरव्हील सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
