ए.ई.जी. फाऊंडेशन, लक्ष्मी कृषी सेवा केंद्र व कदम कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन
ए.ई.जी. फाऊंडेशन, लक्ष्मी कृषी सेवा केंद्र व कदम कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन
अहमदपूर (गोविंद काळे) : १ जूलै,महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून मौजे तांबटसांगवी येथे ए.ई.जी फाऊंडेशन,लक्ष्मी कृषी सेवा केंद्र अहमदपूर आणि कदम कृषी सेवा केंद्र तांबटसांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर परिसरात गावातिल जेष्ठ नागरिक बालासाहेब कदम , रामकिशन सोळंके , गंगाराम नरवटे, गोपाळ राजपंगे, माणिक कदम व गावातिल इतर नागरिक यांच्या हास्ते वृक्षारोपन करण्यात आले यावेळी ए.ई.जी. फाऊंडेशन चे सिद्धेश्वर लाकडे सर, BASF चे सुमित पांडे सर तसेच कदम कृषी सेवा चे संचालक संतोष कदम यांनी झाडे लावन्यासाठी परिश्रम घेतले तसेच लक्ष्मी कृषी सेवा केंद्र चे संचालक शामभाऊ गंगथडे यांनी वृक्ष संवर्धनाचे पर्यावरन संरक्षणासाठी महत्व सांगितले यावेळी गावातिल नागरिकांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली आणि आभार व्यक्त केले.
