“त्या” व्हिडिओ बद्दल पुन्हा आरोप प्रत्यारोप ; खोटे गुन्हे रद्द करून चौकशी करा : महाविकास आघाडी

0
"त्या" व्हिडिओ बद्दल पुन्हा आरोप प्रत्यारोप ; खोटे गुन्हे रद्द करून चौकशी करा : महाविकास आघाडी

"त्या" व्हिडिओ बद्दल पुन्हा आरोप प्रत्यारोप ; खोटे गुन्हे रद्द करून चौकशी करा : महाविकास आघाडी

तो व्हिडिओ राजकीय स्टंट : महायुती

उदगीर (एल.पी.उगीले) : दि. एक जुलै रोजी उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या रॅली मध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणा देताना, “कोण आला रे कोण आला? अमित भैय्या चा बाप आला”, अशा घोषणा दिल्याचा समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल होत होता. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने लगेच पोलीस प्रशासनाला पत्र देऊन या संदर्भात घोषणाबाजी करून आ. अमित देशमुख आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
तशाच पद्धतीची मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे देऊन अशा पद्धतीचा छेडछाड केलेला व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने काही कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले. त्या अनुषंगाने पुन्हा काँग्रेस, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन राजकीय दबावापोटी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केल्याबद्दल निषेध नोंदवत चुकीचे गुन्हे रद्द करून, काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक आ. अमित देशमुख यांची बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अशा पद्धतीच्या तक्रार अर्ज देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बसवराज पाटील नागराळकर, काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उषा कांबळे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंजूर खान पठाण, मुकरम जागीरदार, मधुकर एकुर्केकर, श्रीकांत पाटील, रामेश्वर बिरादार जकनाळकर इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
याच दरम्यान महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन तो व्हिडिओ खरा नसून छेडछाड केलेला आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख हे आमचे देखील आराध्य दैवत आहेत, असे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे नेते राजेश्वर निटुरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भगवान दादा पाटील तळेगावकर, स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मरलापल्ले, श्याम डावळे, सुधीर भोसले, रामराव बिराजदार, राहुल केंद्रे इत्यादींनी पत्रकार परिषद घेऊन सदरील व्हिडिओ हा चुकीचा असल्याचे सांगितले आहे. ना. संजय बनसोडे हे कोणाला शिव्या देणे किंवा कोणाबद्दल अपशब्द वापरणे, कदापि शक्य नाही. असा विश्वासही नीटुरे यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!