उन्नती जाधव स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

0
उन्नती जाधव स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

उन्नती जाधव स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

अहमदपूर (गोविंद काळे) : नुकताच पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्या परीक्षेमध्ये किलबिल नॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी उन्नती मारुती जाधव हिने 260 गुण घेऊन सीबीएसई (इंग्रजी) माध्यमाच्या शाळेतून जिल्ह्यातून प्रथम तर राज्याच्या यादीमध्ये आठवा क्रमांक घेऊन यश संपादन केले. शैक्षणिक वर्ष 2023- 24 या वर्षामध्ये स्कॉलरशिप परीक्षेसाठी इयत्ता पाचवी वर्गातून एकूण 29 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होते त्यापैकी 24 विद्यार्थी हे स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाले असून शाळेचा 82.76% निकाल तर इयत्ता आठवी वर्गातून एकूण तीन विद्यार्थी प्रविष्ट होते तर ते तिन्ही विद्यार्थी पात्र असून त्यांचा 100% निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना शाळेतील मार्गदर्शक शिक्षक ज्ञानेश्वर जाधव सर, धनेश्वर आगलावे यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले व प्राचार्य संतोष पाटील यांनी उन्नती जाधव व तिचे पालक मारुती जाधव यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!