विळेगावात तिक्ष्ण हत्याराने महिलेचा खुन
विळेगावात तिक्ष्ण हत्याराने महिलेचा खुन
विळेगावात तिक्ष्ण हत्याराने महिलेचा खुन
किनगाव (गोविंद काळे) : भावाचा खुन कोणी केला ? ही माहिती असून सुद्धा जाणिवपुर्वक सांगत नाही हा राग मनात धरून ४५ वर्षीय महिलेचा तिक्ष्ण व धारदार हत्याराने उजव्या कानाजवळ, डाव्या बाजुला कपाळावर व डोक्यावर वार करुन खुन केल्याची घटना सोमवारी सांयकाळी विळेगाव शेत शिवारात मन्याड नदीच्या जवळ घडली. मयत महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून विळेगाव येथील दोघावर किनगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथील आरविंद पंढरी तेलगे यांचा काही महिन्यापूर्वी कोणीतरी गावातील अज्ञात व्यक्तीने खुन केला होता व मयत आरविंद तेलगे यांचा मित्र आकाश कचरु ढगे हा असुन मृत्यूच्या दिवशी बराच वेळ त्याच्या सोबत होता. याबद्दल मयत आरविंद यांचा भाऊ साईनाथ पंढरी तेलगे व कुंटुंबियानी चौकशी व धमकी देवून विचारणा केली . परंतू काहीच सांगत नसल्याने आकाश ढगे यांना पुर्ण माहिती असावी अथवा यांनीच खुन केला असावा अशी साईनाथ तेलगे यांच्या मनात खुनगाठ बांधली गेली यांच्या घरातील एक जणाचा खुन करून भावाच्या खुनाचा बदला घ्यायचा हे साईनाथच्या मनात कायम झाले. आकाश ची आई तारामती कचरु ढगे (वय ४५) ही सोमवार दि १ जुलै रोजी दुपारी म्हैस चारण्यासाठी मन्याड नदी शेजारी बालाजी संभाजी तेलगे याच्या शेतामध्ये गेली होती. मालक साईनाथ पंढरी तेलगे व सालगडी बाबु हाक्कानी शेख यांनी म्हैस चाराताना एकठीला पाहिले. या दोघांनी आकाशच्या आईला जीवे मारून भावाच्या खुनाचा बदला घ्यायचा कट शिजवीला सांयकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास टोकदार व धारदार हात्याराने उजव्या कानाजवळ, डाव्या बाजुला कपाळावर व डोक्यावर वार करुन खुन केला. महिलेचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहताचा किनगाव पोलीसांना फोन आला. तेंव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपुर मनीष कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे व पोलीस कर्मचारी घटनास्थाळी प्रत्यक्ष भेटून दिली. मयत महिलेचा मुलगा आकाश उर्फ नागार्जुन कचरु ढगे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात मालक साईनाथ पंढरी तेलगे व सालगडी बाबु हाक्कानी शेख यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करून दोघांना ही अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत.
