आ. अमित देशमुख यांची बदनामी करणारा व्हिडिओ, खरा खोटा वाद विकोपाला ! महाविकास आघाडी कडून पाच जुलै रोजी रस्ता रोको !!

0
आ. अमित देशमुख यांची बदनामी करणारा व्हिडिओ, खरा खोटा वाद विकोपाला ! महाविकास आघाडी कडून आज रस्ता रोको !!

आ. अमित देशमुख यांची बदनामी करणारा व्हिडिओ, खरा खोटा वाद विकोपाला ! महाविकास आघाडी कडून आज रस्ता रोको !!

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधी तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी मोठी रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये अनेक घोषणा दिल्या होत्या. त्यापैकी एक घोषणा आक्षेपार्य असल्याचे कारण पुढे करत काँग्रेस पक्षाच्या वतीने ठीक ठिकाणी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेऊन काँग्रेसचे नेते आ. अमित देशमुख यांची बदनामी करणाऱ्या घोषणा देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ही केली होती.
त्या मागणीला काऊंटर चेक देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तो व्हायरल होत असलेला व्हिडिओ छेडछाड केलेला आहे. अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीला प्राधान्य देत उदगीर पॉलिटिक्स एनसीपी या फेसबुक पेज चालवणारा व इतर आरोपींनी त्या व्हिडिओत बदल केला व फेसबुक पेजवर अपलोड केला म्हणून गु.र.नंबर 189 /24 कलम 356 (2) बी एन एस सहकलम 66 (अ) (ब) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक करण सोनकवडे हे करत आहेत.
या गुन्हा दाखल प्रकरणानंतर पुन्हा वातावरण तापले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन घोषणा देणाऱ्या वर गुन्हा दाखल करा, आंदोलन करणाऱ्या वर किंवा तशी माहिती लोकांच्या समोर आणणाऱ्या वर गुन्हा दाखल करू नका. राजकीय दबाव पोटी दाखल केलेले ते गुन्हे परत घ्या. म्हणून निवेदन दिले आहे. सदरील निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेत पहिला टप्पा म्हणून आज दिनांक पाच जुलै रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. शिवाजी मुळे, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव उषा कांबळे, काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष शीलाताई पाटील, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत टेंगेटोल, काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, गणराज्य पक्षाचे नेते अजित शिंदे, राष्ट्रवादीचे गजानन साताळकर ,अजीम दाईमी इत्यादींनी दिली आहे. तसेच जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत अशीही मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात गाव पातळीवर आंदोलन सुरू केले जाईल असा इशाराही दिला आहे.
याच दरम्यान महायुतीच्या वतीने भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भगवान दादा पाटील तळेगावकर, श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, प्रवीण भोळे, सय्यद जानी, शशिकांत बनसोडे, समीर शेख इत्यादींनी पत्रकार परिषद घेऊन तो व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा आणि बनावट असल्याचे सांगितले. याप्रसंगी राजेश्वर निटुरे आणि सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी सांगितले की, सदरील व्हिडिओ काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी छेडछाड करून नेत्याजवळ आपुलकी निर्माण करण्यासाठी व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. विलासराव देशमुख यांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर असल्याचेही त्यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!