जुन्या भांडणावरून पुन्हा वाद, भावजईचा खून

0
जुन्या भांडणावरून पुन्हा वाद, भावजईचा खून

जुन्या भांडणावरून पुन्हा वाद, भावजईचा खून

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर शहरातील बसवेश्वर गल्ली परिसरात राहणाऱ्या महिलेच्या दिराने मागील भांडणाचा राग मनात धरून बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सदरील महिलेच्या पोटात चाकूने वार करून खून केल्याची भयंकर घटना घडली आहे. या संदर्भात उदगीर शहर पोलीस स्टेशन मध्ये रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर शहरातील काळा मारुती, बसवेश्वर गल्लीमध्ये शालुबाई चंद्रकांत आलमकरे (वय 55 वर्ष) व सुरेश अमृताप्पा आलमकरे हे वेगवेगळे राहतात. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरेश आलमकरे यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून शालुबाई आलमकरे यांना शिवीगाळ करून पोटावर चाकूने वार केले. शालुबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असतात, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे भाग्यश्री सुरेश आलमकरे यांच्या फिर्यादीवरून पहाटे आरोपी विरुद्ध कलम 103 (1), 352 बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!