३७ व्या जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ च्या दोन विद्यार्थींनीचे यश
३७ व्या जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ च्या दोन विद्यार्थींनीचे यश
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मृणाल नितीन पोद्दार व श्रुती गोविंद रंदवे या दोन विद्यार्थ्यांनी ठाणे व बीड जिल्हा असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या एकेरी व दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता ९ वी वर्गात शिकत असलेली विद्यार्थींनी मृणाल नितीन पोद्दार हिने एकेरी स्पर्धेत १७ व १९ वर्षाखालील गट स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर तर १७ वर्षाखालील स्पर्धेत दुहेरी मध्ये प्रथम क्रमांकावर विजय मिळवलेला आहे.
तर ३७ व्या बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये इयत्ता १० वी वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी श्रुती गोविंद रंदवे हिने १५ व १७ वर्षाखालील एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालेली आहे. या यशाबद्दल संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्थासदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी आदींनी अभिनंदन केले आहे.
