इनरव्हीलच्या वतीने डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार

0
इनरव्हीलच्या वतीने डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार

इनरव्हीलच्या वतीने डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार

उदगीर : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा मानून अहोरात्र सेवा देणाऱ्या माणसातील देव म्हणजे डॉक्टर त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी इनरव्हीलच्या वतीने सदस्य डॉक्टरांचा सत्कार संपन्न करण्यात आला.यामध्ये डॉ सविता पदातुरे (स्त्री रोग तज्ञ,पदातुरे हाॅस्पिटल),डॉ प्रियांका राठोड (स्त्री रोग तज्ञ, सह्याद्री हॉस्पिटल), डॉ सुप्रिया जगताप(स्त्री रोग तज्ञ,मंगलाय हाॅस्पिटल) डॉ शितल एकघरे(भुल तज्ञ) डॉ सोनल कांडगीरे(ड्रामेटोलोजिस्ट, व्यंकटेश हाॅस्पिटल), डॉ तृप्ती दाचावार(आयुर्वेदिक),डॉ पुजा चंबुले (दंतरोग तज्ञ,साई हाॅस्पिटल),डॉ शितल पाटील (दंतरोग तज्ञ), , डॉ सुप्रिया सोनटक्के (दंतरोग तज्ञ) डॉ चंद्रिका पाटील(वैद्यकीय अधिकारी, उदगीर),डॉ ज्योती सोमवंशी (नेत्ररोग तज्ञ,दिपज्योती हाॅस्पिटल),डॉ श्रद्धा वट्टमवार (दंतरोग तज्ञ,व्यकटेश्वरा हाॅस्पिटल), डॉ संजिवनी भातांब्रे(पॅथालोजिस्ट,अनंतपाळ हाॅस्पिटल), डॉ रोहिणी भंडारे (दंतरोग तज्ञ,भंडारे हाॅस्पिटल) डॉ आशा मद्देवाड (आयुर्वेदिक,हाळी), यांचा सत्कार करण्यात आला आमच्या इनरव्हील मध्ये उदगीर मधील प्रतिष्ठीत एकुण १७ डॉक्टर सदस्य आहेत यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे मत इनरव्हीलच्या नुतन अध्यक्षा मानसी चन्नावार यांनी व्यक्त केले डॉ सविता पदातुरे मॅडम यांनी महिलांमधील आरोग्यविषयक समस्या व जागृती यावर अप्रतिम मार्गदर्शन केले याप्रसंगी झोनल सब कार्डिनेटर व कोषाध्यक्ष मीरा चंबुले,माजी अध्यक्षा स्वाती गुरुडे,सचिव पल्लवी मुक्कावार आय एस ओ प्रिया नारखेडे, एडिटर अलका येरोळकर उपाध्यक्ष अश्विनी देशमुख व सदस्य तुलसी देशमुख, रोहिणी चाटे,सुजाता कोन्हाळे, सोनाली पाटील,दिपा कुलकर्णी संध्या कदम यांची उपस्थिती होती पदातुरे हाॅस्पिटल मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला याबद्दल इनरव्हील तर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!