स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक – गणेश हाके
स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक - गणेश हाके
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे इयत्ता पाचवी चे 19 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
अहमदपूर,(गोविंद काळे) : प्राथमिक शाळेतूनच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेला बसून चिकित्सकपणे अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहेत असे आग्रही प्रतिपादन गणेश दादा हाके यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केले. ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रारंभी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव प्राचार्या रेखाताई, तरडे, प्रा. हनुमंत देवकते, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश हाके म्हणाले की, शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षेतूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
यामध्ये आर्या भानुदास दुधाटे जिल्ह्यात तिसरी, अमृता जयपद्म वजीर जिल्ह्यात नववी, ज्ञानेश्वरी रमेश सूर्यवंशी, जिल्ह्यात 16 वी, आनंदी मनोज कदम जिल्ह्यात 27 वी, तेजल हरिहर सोनवणे,मयूर ज्ञानेश्वर उप्पलवाड,आराध्या अविनाश राठोड, जान्हवी दत्तात्रय डांगे, संकर्षण गोपाल पलमटे, सिद्धांत शिवकुमार खेडकर ,अनुष्का बाबुराव नेळगे ,अंजली श्रीराम आरदवाड, माही राजकुमार पन्हाळे,व्यंकटेश राजू गुंडाळे,सार्थक दिगंबर मेंढके, शुभ्रा गोविंद भोंग, आराध्या उमाकांत लांडगे
प्रतीक माधव वाघमारे, पियुष गजानन गुंडीले हे 19 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना सविता पाटील, शारदा तिरूके, त्रिगुणा मोरगे, अश्विनी घोगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार नंदकुमार मध्येवाड यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
