उदगीर विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावण्यासाठी सज्ज राहा – बालाजी रेड्डी
उदगीर विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावण्यासाठी सज्ज राहा - बालाजी रेड्डी
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आढावा बैठक जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यात येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका, जुलै महिन्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावात शाखेच्या वतीने सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करावे,शिवसेना पक्ष संघटन मजबूत करावे. या विषयावर सखोल चर्चा झाली,यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल , उपजिल्हाप्रमुख अंकुश कोणाळे, विधानसभा प्रमुख श्रीमंत सोनाळे, विधानसभा क्षेत्र समन्वयक प्रकाश हैबतपूरे , शहर प्रमुख अनिल पंचाक्षरी , महिला आघाडीच्या विधानसभा संपर्कप्रमुख आरुणताई लेंडाणे , शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास पाटील ,सचिन साबणे ,युवासेना जिल्हा सरचिटणीस रमण माने,युवासेना तालुकाप्रमुख चंद्रकांत सांगळे,अहमदपूर उपतालुकाप्रमुख दत्ता हिंगणे, सुभाष गुंडीले,उदगीर उपतालुकाप्रमुख ऍड रामदास काकडे,मनोज पाटील,महेश फुले,प्रदीप मोरतळे,ऍड शरद पाटील, सहसचिव विष्णू चिंतालवार,बाळू वडले, विभागप्रमुख अविनाश राठोड,दिनेश तेंलग, बालाजी डुबुकवाड,शिवसेना तालुकासंघटक बालाजी पुरी,तालुकासमनवयक अरुण बिरादार,पोलकर महेश,सखाराम गुराळे ,लक्ष्मीकांत गुडमेवार, व्यंकट साबणे, गोविंदमामा बेंबडे,शिवकांत चेटनाळे ,निलेश विभूते, किरण कांबळे,ओम ददापुरे,बालाजी वरदाळे,बाजीराव राजनाळे,कृष्णा कांचे, आदित्य सांडगे,अनिकेत काळेगोरे,बापूराव कदम,सुरज कांबळे,दत्ता जाधव,संगम मेहत्रे,अनिल मोटे,विणेश मोटे,मनोज फुले,इंद्रजित माळकरी,महिला आघाडी सरोजा बिरादार, सुनीता फुलारी,शीतल जाधव, वच्छला मूळे,कल्पना जाधव,अनिता गायकवाड,शाहूबाई घोगरे,नितीन पाटील वंजारवाडी तसेच आजी,माजी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
