आ. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास सामाजिक उपक्रम संपन्न
आ. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास सामाजिक उपक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आ. बच्चू कडू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उदगीर येथे साजरा करण्यात आला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्च कडू यांच्या 54 व्या वाढदिवस प्रति वर्षाप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्ष करडखेल शाखा अध्यक्ष रामेश्वर स्वामी यांच्या वतीने जिल्हा परिषद करडखेल शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्ष रोपण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रहार प्रवक्ते बंडेप्पा पडसलगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, उपसरपंच नामदेव मुळे,शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गफार तांबोळी,पोलीस पाटील एकनाथ कसबे, बालाजी हलसे,महेश चिंदे,कुमार हत्ते, व्यंकट निडवंचे,लक्ष्मण जाधव,माणिक बुरले , बालाजी गुराळे,दता राघु,लखन कसबे, ज्ञानदेव कलमुकले, बालाजी बुरले उपस्थित होते,मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच राधाई ब्लड बँक उदगीर येथे 21 प्रहार पदाधिकाऱ्यानी रक्तदान केले. यावेळी राधाई ब्लड बँक चे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.
निवासी मूकबधीर विद्यालय साई नगर, बिदर गेट, उदगीर येथे मुकबधीर विद्यार्थ्यांना फळ वाटप करून दिव्यांग बांधवांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अमित खंदारे यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश व अमित खंदारे यांची उदगीर शहर संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रहार ग्रामीण जिल्हाध्यक्ष कांचन भोसगे,लातूर जिल्हा महिला उपाध्यक्ष प्रेमलता भंडे,तालुकाध्यक्ष विजयमाला पवार जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे , तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे ,जिल्हा प्रवक्ते बंडेप्पा पडसलगे ,तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे ,शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे , प्रसिद्धि प्रमुख अभय कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार,शहर सचिव बालाजी बिरादार , तालुका सरचिटणीस सुदर्शन सूर्यवंशी ,तालुका संघटक सोपान राजे, विद्यार्थी शहर अध्यक्ष मंगेश येरकुडे,शहर कार्याध्यक्ष शाहाजान शेख, इमरान शेख,उपाध्यक्ष मोहम्मद चौधरी,शहर सहसंपर्क प्रमुख शोएब शेख,युवक शहर अध्यक्ष शिवाजी बिरादार, प्रहार सेवक गणेश दावणे, निलंगा विधानसभा प्रमुख हणमंत धनुरे , कल्याण धनुरे इत्यादी प्रहार पदाधिकारी उपस्थित होते .
