अल्पवृष्टीने तालुक्यातील खरीप पिके धोक्यात, शेतकऱ्याला मदत करा – बस्वराज रोडगे
अल्पवृष्टीने तालुक्यातील खरीप पिके धोक्यात, शेतकऱ्याला मदत करा - बस्वराज रोडगे
उदगीर (एल पी उगिले) : उदगीर तालुक्यातील अनेक महसूल मंडळामध्ये कमी पर्जन्यमान झाल्याने पेरणी केलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे. उदगीर तालुक्यातील विशेषतः देवर्जन मंडळामध्ये अति अल्पवृष्टी झालेली आहे. देवर्जन परिसरातील खरीप पिके पावसाअभावी धोक्यात आलेली आहेत. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न उद्भवत आहे. गेली तीन वर्षे या परिसरात सततचा दुष्काळ पडलेला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 ला या परिसरातली पीक आणेवारी कमी असतानाही या परिसरात पिक विमा मिळालेला नाही. आणि या वर्षी तर अति अल्प पर्जन्य झाल्याने जून महिन्यात पेरलेली पिके आज कोमेजून जात आहेत. गेल्या वर्षी या परिसरातील अन्नदाता शेतकऱ्यांना पीक कर्जावरील व्याज परत मिळालेले नाही. प्रशासनाला या परिसरातील शेतकरी दिसत नाही का? असा सवाल या परिसरातील शेतकरी करत आहेत. चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शासनाने करावी. अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या माजी तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्याकडे असलेली गाई, म्हशी, बैल हे सुद्धा शेतकऱ्यांना जगवणे अति अवघड झालेले आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीचा विचार करून परिसरातील नजरे पीक पाहणी अहवाल शासन दरबारी कळावे. अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तरी प्रशासनास विनंती आहे विना विलंब आपण नजरी पीक पाहणी अहवाल सादर करावा आणि शेतकऱ्यास शक्य असेल ती तातडीने मदत करावी अशी ही आग्रही मागणी बसवराज रोडगे यांनी महसूल प्रशासना मार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
