इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा शैक्षणिक अध्यापनात पुरेपूर उपयोग करून घ्यावा – सूनिताताई चवळे

0
इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा शैक्षणिक अध्यापनात पुरेपूर उपयोग करून घ्यावा - सूनिताताई चवळे

इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा शैक्षणिक अध्यापनात पुरेपूर उपयोग करून घ्यावा - सूनिताताई चवळे

अहमदपूर (गोविंद काळे) : आज अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधने बाजारात उपलब्ध झालेली आहेत त्या साहित्याचा तंत्रज्ञानाचा आपल्या शैक्षणिक कार्यात पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे असे प्रतिपादन टागोर शिक्षण समितीच्या सहसचिव सौ. सुनीताताई चवळे यांनी केले.
त्या यशवंत प्राथमिक शाळेत आय.डी.एफ.सी. बँकेकडून मोफत मिळालेल्या डिजीटल बोर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या.
यावेळी मंचावर रिजनल मॅनेजर शरद डी. देडे, बीड डिव्हिजनचे मॅनेजर प्रवेश चौधरी, अविनाश चौधरी, गणेश काळे, माधव वाघमारे, अजय मस्के, वैभव दहिफळे शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. पारशेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना सुनिताताई चवळे म्हणाल्या की डिजिटल बोर्ड असेल. मोबाईल वरील विविध अँप असतील अशा अनेक प्रकारच्या इ. लर्निंगचा वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकता येते तसेच विविध कविता, गाणी, गोष्टी, खेळ असे कितीतरी प्रोग्राम इ लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल व यातूनच विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल. त्यांचा सर्वांगीण विकास होईल म्हणून अशा ही लर्निंगच्या पुरेपूर वापर आपल्या अध्यापनात होणे गरजेचे आहे.
सदरील इलेक्ट्रॉनिक बोर्ड आय.डी.एफ.सी. बँक शाखा अहमदपूर यांच्याकडून शाळेला मोफत देण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. पारशेट्टे यांनी केले. तर सूत्रसंचालन एम. एम. शेख यांनी केले तर विलास चापोलीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव भोजराज. एस. एस. बिरादार, आनंद बिरादार,श्रीमती उमा दैठणकर,संदीप पांचाळ, गणेश मुसळे, यशवंत कोलपुसे, रवींद्र गेडाम, श्रीमती शिवशक्ती हिपाळे, श्रीमती अश्विनी गौड, बबनराव गोरगिळे यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!