जि प च्या सहशिक्षिका केवळ ताई तिगोटे गायकवाड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात साजरा

0
जि प च्या सहशिक्षिका केवळ ताई तिगोटे गायकवाड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात साजरा

जि प च्या सहशिक्षिका केवळ ताई तिगोटे गायकवाड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात साजरा

शिक्षकाने जीवनभर विद्यार्थ्यांना घडवावे
गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांचे प्रतिपादन

   अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत मानाचे स्थान असल्यामुळे शिक्षकानी  सेवानिवृत्तीनंतर सुद्धा समाज घडविण्याचे प्रामाणिकपणे कार्य करावे असे आग्रही प्रतिपादन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी केले.
 ते दि. पाच रोजी जि प केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका केवळ ताई तिगोटे गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्य सेवापूर्ती गौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेश्वर कांबळे, प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर प्राचार्य रेखाताई तरडे, केंद्रप्रमुख रमाकांत खंदारे, मुख्याध्यापक भानुदास शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचा शुभारंभ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहशिक्षिका केवळ बाई ति गोटेआणि त्यांचे पती सेवानिवृत्त उपप्राचार्य शिवाजी गायकवाड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य रेखा तरडे, केंद्रप्रमुख रमाकांत खंदारे, भानुदास शिंदे, कौशल्या पवार, रेजा सोरगेकर ,सून रोहिणी गायकवाड, अमोल गायकवाड, पती शिवाजी गायकवाड मच्छिंद्र तिगोटे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ गुट्टे यांनी तर आभार एस बी शिवणे यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!