हडोळती येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीचे भुमिपूजन
हडोळती येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीचे भुमिपूजन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील हडोळती येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांनी बँकेसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच येथे प्रशस्त, इमारत बांधून सभासदाच्या सेवेसाठी परिपूर्ण होईल असे प्रतिपादन लातूर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. प्रमोद जाधव यांनी केले.
ते अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील जिल्हा बँकेच्या शाखेच्या इमारतीचे भूमिपुजन समारंभात बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक वाहीनी कार्यरत असणारी व महाराष्ट्रात नंबर एकवर अग्रेसर असलेली लातूर जिल्हा बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेकडून जिल्ह्यातील प्रत्येक बँकेच्या शाखा तंत्रज्ञान वापरून जलद गतीने डीजिटल पद्धतीने ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच
धर्तीवर हडोळती येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांनी बँकेसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ॲड. प्रमोद जाधव, कृउबा सभापती मंचकराव पाटील, उपसभापती संजय पवार, उत्तमराव यादव, संचालक पृथ्वीराज सिरसाठ, सरपंच शकुंतला भोगे, चेअरमन महेश हंबीर, अनुप शेळके, राजकुमार पाटील, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृतीराव कांबळे, गोविंद रसाळ, किशन पाटील, महेश पाटील, शिवाजी पवार, बलभिम पवार, राम मुळके आदी मान्यवर उपस्थीत होते.
बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख हे शेतकरी सभासदांच्या हितासाठी विविध व नावीन्यपूर्ण योजना राबवत आहेत. त्याच पध्दतीने हडोळती शाखेतून ही ग्राहकांना अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे असे ॲड प्रमोद जाधव यांनी सांगीतले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक हडोळतीचे चेअरमन महेश हंबीर यांनीसुत्रसंचलन ॲड.आंनद जाधव यांनी तर आभार बेलगांवकर यांनी मानले.
कार्यक्रमास फील्ड ऑफीसर रामदास देशमुख, चेअरमन चंद्रकांत पाटील, भरत तरगुडे व हडोळती सोसायटीचे सर्व संचालक मंडळ ग्रामपंचायतचे सदस्य आणि हडोळती शाखेच्या अंर्तगत विविध सोसायटीचे चेअरमन, सचिव, व्यापारी, ग्राहक उपस्थित होते.
