अहमदपूर तालुक्यात सर्वदूर पाऊस, खरीपास जीवदान ,बळीराजा सुखावला..
अहमदपूर तालुक्यात सर्वदूर पाऊस, खरीपास जीवदान ,बळीराजा सुखावला..
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यात मागील दोन दिवसापासून कमी अधिक पावसाला सुरुवात झाली होती , खास करून दि ७ जुलै रोजी रात्री झालेल्या तालुक्यातील पावसामुळे खरीप हंगामाला जीवनदान
मिळाले असून तालुक्यात कमी पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना या पावसाचा फायदा झाला आहे . त्यामुळे तूर्तास तरी बळीराजा सुखावल्याचे चिन्ह दिसत आहे.
मागील पंधराव्याड्या पासून पावसाने तालुक्यात चांगलीच ताडन दिली होती. काही ठिकाणी थोडा पाऊस पडला होता , बऱ्याच भागात पाऊस न झाल्यामुळे खरिपात पेरलेले कापूस सोयाबीन तूर हे पिके सुकू लागली होती.
मात्र आता तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे खास करून दि ७ जुलै रोजी रात्री नऊ ते एकच्या दरम्यान तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने या सुकत असलेल्या पिकांना जीवनदान मिळाले आहे.
तालुक्यात सर्वाधिक 37 हजार 757 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे मात्र कमी पावसामुळे हे संपूर्ण पीक धोक्यात आले होते. जून महिन्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे अहमदपूर तालुक्यात जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पेरण्यास सुरुवात झाली अगदी वेळेवर सुरू झालेल्या पेरणीमुळे सुरुवातीला पिके एकदम चांगली होती .मात्र मधल्या काळात पावसाने ताण दिली व पिके सुकू लागली. त्यामुळे शेतकरी चांगला चिंता दूर झाला होता मात्र काल पडलेला पाऊस हा सर्वच पिकासाठी फायदेशीर ठरला आहे.
अहमदपूर तालुक्यातील सहा महसूल मंडळापैकी सर्वाधिक पाऊस अहमदपूर 89.8 मिलिमीटर व खंडाळी 89. 6 मिलिमीटर एवढा झाला आहे यानंतर किनगाव मंडळात 39.5 मिलिमीटर ,अंधेरी मंडळात 55.8 मिलीमीटर ,हाडोळती मंडळात 16.8 मिलीमीटर तर शिरूर मंडळात 16.2 मीलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
अहमदपूर तालुक्यातील जास्तीत जास्त जमीन ही कोरडवाहू व खडकाळ मुरमाड आहे या जमिनीमुळे पाऊस सतत पडणे गरजेचे असते मात्र अचानक पावसाने दिलेल्या दडीमुळे ही पिके सुकू लागली होती.
तालुक्यात सर्वाधिक 37 हजार 757 हेक्टर सोयाबीन ,914 1 हेक्टर तूर 10243 हेक्टर कापूस एवढे खरिपातील महत्त्वाचे क्षेत्र आहे.
एकंदर या झालेल्या पावसामुळे या पिकांना चांगलाच फायदा होणार आहे.
पावसाने दडी दिली होती यामुळे पिके सुकत असल्याने चिंतातुर असलेल्या शेतकरी या पावसामुळे मात्र सुखावलेला दिसत आहे.
कोट
मागील काळात पावसाने दडी दिल्याने पिके ऊण धरू लागली होती व काही भागात जमिनीस भेगाही पडल्या होत्या, पिके सुकू लागली होती. एवढा खर्च करून बी बियाणे खात घालून केलेल्या पेरणीची उगवण तर चांगली झाली . मात्र कमी पावसामुळे सुकू लागलेल्या पिकामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण होते. काल संध्याकाळी नऊ ते एक या कालावधीत चांगला पाऊस अंधोरी भागात झाल्याने या सर्व खरीप पिकाला जीवनदान मिळाले असून आता ही पिके चांगली कळा धरताना दिसत आहे.
व्यंकटराव नारायण कदम
शेतकरी ढाळेगाव तालुका अहमदपूर
