डॉ. जयप्रकाश केंद्रे यांना राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार
डॉ. जयप्रकाश केंद्रे यांना राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : द युवा ग्रामीण प्रत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असलेले डॉ.जयप्रकाश केंद्रे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे
समाजात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील अधिकारी यांना पुरस्कार दिले जातात यावर्षीचा दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयप्रकाश केंद्रे यांना सदर पुरस्कार शिरुर नगर परिषद, घोडनदी येथील सांस्कृतीक हॉल येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात द युवा ग्रामीण पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार बाबासाहेब यांच्या हस्ते देण्यात आला
डॉ.केंद्रे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शासकीय ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ सूरजमल सिंहाते, डॉ. अमृत चिवडे, डॉ पवार, डॉ चाटे, डॉ . मधुसुदन चेरेकर, डॉ भोसले, डॉ रमेश केंद्रे आदींनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
