वारी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

0
वारी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

वारी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रति वर्षा प्रमाणे उदगीरचा वारी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. शंकरआप्पा मठापासून ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर दूध डेरी पर्यंत टाळ, मृदंग गजर आणि अभांगच्या तालावर टाळकरी,वारकरी,शाळेतील मुले तल्लीन झाले होते.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घोड्याचे आणि मेंढ्याचे रिंगण चांगल्या प्रकारे संपन्न झाले. हे या वारी सोहळ्याचे आकर्षक होते.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी हुडे,कल्याण पाटील,अंकुश कोनाळे, पद्माकर उगीले,अनिल पंचाक्षरी,डॉ हेरकर,शहर पोलीस निरीक्षक सोंनकवडे,श्रीकांत पाटील, राजेश्वर महाराज लाळीकर,प्रकाश हैबतपूरे, अनिता जगताप, श्रीमती बिरादार , डी. एस. बिरादार,संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय ,महेश विद्यालयांचे जानापूर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी हे वारकरी वेश भूषेत,तसेच ६० गावचे महाराज, वारकरी महिला मंडळ,पोलिस प्रशासन,कार्यकर्ते सहभागी होते.वारी सोहळ्याचे आयोजन अजित शिंदे,चंद्रकांत टेंगेटोल,आशिष पाटील राजूरकर,संदीप पंढरीनाथ पाटील,सतीश पाटील मानकीकर, अक्षित हेरकर,विकास तपशाळे, जय स्वामी, शिवकुमार उपरबावडे, कपिल शेटकार,संदीप निडवदे, विश्वजित पाटील व सोहळा समितीच्या वतीने आयोजित केले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!