वारी ‘समतेची’ दिंडी ‘वृक्षारोपणाची’ चे पंढरपुराकडे प्रस्थान

0
वारी 'समतेची' दिंडी 'वृक्षारोपणाची' चे पंढरपुराकडे प्रस्थान

वारी 'समतेची' दिंडी 'वृक्षारोपणाची' चे पंढरपुराकडे प्रस्थान

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीच्या वारीत राबविला अभिनव पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा उपक्रम .

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व डॉ.मारोती कसाब आणि डॉ.किरण गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली आषाढी दिंडी मार्गात जागोजागी वृक्षारोपण करण्यासाठी ‘वारी समतेची , दिंडी वृक्षारोपणाची ‘ या उपक्रमाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत महात्मा फुले महाविद्यालय निरंतर सामाजिक , सांस्कृतिक , क्रीडा तसेच पर्यावरण पूरक विविध क्षेत्रांमध्ये प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणजे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी.टी. शिंदे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या परवानगीने ‘वारी समतेची, दिंडी वृक्षारोपणाची ‘ हा उपक्रम हाती घेऊन दि. १२ जुलै २०२४ रोजी महाविद्यालयातून महाविद्यालयातील महिला प्रा. डॉ. सीमा उपलवाड, प्रा. कल्पना कदम, प्रा. प्रतीक्षा मंडोळे यांनी ‘औक्षण’ केल्या नंतर या दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले.
जागोजागी वृक्षारोपण-
विशेष म्हणजे दिंडी मार्गावर तुळजापूर तालुक्यात सांगवी येथे तुळजापूर च्या शक्तीपीठ दिंडीचे महंत रामेश्वर स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली. तसेच मोहोळ तालुक्यात उपळी या गावी गावातील ज्येष्ठ दांपत्य चांगदेव सुर्वे व सौ. मालनबाई चांगदेव सुर्वे यांच्या हस्ते तसेच पंढरपूर तालुक्यातील डेरला – वारला या गावी महात्मा फुले महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ . किरण गुट्टे यांचे आई वडील ज्येष्ठ वारकरी सौ. गयाबाई वामनराव गुट्टे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व समता दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली.
यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह डॉ . मारोती कसाब , उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, ह . भ . प .प्रो. डॉ . अनिल मुंढे महाराज, डॉ.सतीश ससाणे, प्रो.डॉ.नागराज मुळे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे , डॉ.किरण गुट्टे, डॉ .पांडुरंग चिलगर, डॉ. बब्रुवान मोरे , डॉ .डी . एन .माने , डॉ . प्रकाश चौकाटे , डॉ . प्रशांत बिरादार ,ग्रंथपाल प्रा .परमेश्वर इंगळे ,डॉ . संतोष पाटील , प्रा .प्रकाश गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर ,अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे ,चंद्रकांत शिंपी आदिंनी दिंडीमध्ये सहभाग नोंदवून भजन कीर्तनासह अध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेत पर्यावरण पूरक उपक्रम राबविला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!