उदगीर शहरात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे !
उदगीर शहरात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे !
उड्डाणपुलाखाली बेकायदेशीर पार्कींग, जाणारे येणाऱ्या अडचण
उदगीर(एल पी उगीले) : उदगीर शहरातील राष्ट्रीय महामार्गला लागून असलेल्या आणि साई नगर,गोपाळ नगर, हावगीस्वामी काॅलनी, विवेकानंद नगर ते उदगीर शहरात छ.शिवाजी महाराज चौक,बसस्थानकाकडे जाणारा हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. या भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय तसेच दळणवळणासाठी शहरात ये-जा करावे लागते. पाऊस पडला की पायी चालणे सुद्धा अवघड आहे.
एका बाजूने असणारी गटारे त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. खड्डे इतके मोठे आहेत की दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. खड्यांमुळे काही वाहनधारक चुकीच्या बाजूने गाड्या चालवत आहेत. त्यामुळे याचा नाहक त्रास दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पावसाळा संपेपर्यंत तात्पुरती का होईना डागडुजी झाली पाहिजे. जर रस्त्याचे काम इथे झाली नाही तर अपघाताची स्थिती नाकारता येणार नाही. म्हणून नगरपालिका व संबंधित ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.
बिदर गेट उड्डाणपुलाखाली वर्षानुवर्षे पाणी; वाहनधारकांना कायमची डोकेदुखी
बिदर गेट उड्डाणपुलाखाली पाणी साचून नांदेड-बिदर महामार्गाच्या बिदर गेट उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यावरील पाण्याची अंडरग्राउंड व्यवस्थापन नसल्याने पाऊस पडल्यावर तळेच्या तळे साचते.
संबंधित महामार्गाच्या प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असून, या भागातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. बिदर गेट येथे उड्डाणपूल बांधला, मात्र उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची व सेवा रस्त्यांची सोय मात्र केली नाही.बिदर गेट उड्डाण पुलाची मुळातच उंची कमी आहे.मोठ्या वाहनांना इथे वळसा देखील घेता येत नाही, तसेच याठिकाणी अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाणी साचून व काही अनाधिकृत वाहणे उड्डाणपुलाखाली बेकायदेशीर पार्कींग करत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे, सबंधित महामार्ग प्रशासन व कंत्राटदारांकडून इथे पाणी साचणार नाही, याची दक्षता घेतली नाही. किमानाचा नगरपालिकेने तरी या भागात राहणाऱ्या नागरिकांना उदगीर शहरात ये जा करण्यासाठी आता आवश्यक असलेले या रस्त्याला दुरुस्त करून सोय करावी अशी मागणी होत आहे.
