इनरव्हील क्लब अध्यक्षपदी मानसी चन्नावार तर सचिवपदी पल्लवी मुक्कावार
इनरव्हील क्लब अध्यक्षपदी मानसी चन्नावार तर सचिवपदी पल्लवी मुक्कावार
उदगीर (एल.पी.उगीले) : इनरव्हील क्लबचा २०२४-२५ वर्षाचा पदग्रहण सोहळा पास्ट डिस्ट्रिक्ट एडिटर व सचिव इनरव्हील क्लब लातूर च्या अनुराधा अग्रवाल तसेच आर्य वैश्य महासभेच्या अध्यक्ष सुजाताई पंदीलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वर्षासाठीची कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली. ती पुढील प्रमाणेयामध्ये मानसी चन्नावार (अध्यक्ष) ,अश्विनी देशमुख (उपाध्यक्ष), पल्लवी मुक्कावार (सचिव),योजना चौधरी (सहसचिव) मीरा चंबुले (कोषाध्यक्ष),अलका येरोळकर (एडिटर),प्रिया नारखेडे (आय एस ओ), यांनी पदभार स्वीकारला. यावर्षी पनेवल येथे झालेल्या स्वर्णप्रभा या विशेष सभेत उदगीर क्लबला सर्वाधिक सदस्य नोंदणी, बेस्ट एडिटर(अलका येरोळकर), बेस्ट ट्रेझरर ( पल्लवी मुक्कावार),आय एस ओ डिसी स्टार (योजना चौधरी), सर्वाधिक इव्हेंट मध्ये उपस्थिती,झोनल सब कोर्डिनेटर(मीरा चंबुले)असे तब्बल सहा पारितोषिके मिळाली आहेत. त्याचे वितरण करण्यात आले. याच बरोबर गेल्या वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रमासाठी प्रायोजक म्हणून काम करणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.मागील वर्षी राबविण्यात आलेल्या रवी बापटले यांच्या सेवालयाचा चॅरेटी शो आणि महिला मधील होणाऱ्या गर्भाशयाचा कॅन्सर, बचावात्मक लसीकरण (५० मुलींना) या दोन प्रमुख प्रोजेक्टसाठी व सर्व सदस्यांच्या सहकार्याचे अनुराधा अग्रवाल यांनी विशेष कौतुक केले. सुजाता ताई यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मागील वर्षाच्या प्रोजेक्टचा आढावा माजी अध्यक्षा स्वाती गुरुडे यांनी सांगितला. प्रमुख अतिथीचा परिचय पल्लवी मुक्कावार यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे स्वागतगीत प्रिती दुरुगकर ,स्वागत नृत्य भाग्याश्री स्वामी यांनी सादर केले. प्रास्ताविक मीरा चंबुले यांनी तर सुत्र संचालन अश्विनी देशमुख यांनी केले. या सोहळ्यात दोन प्रोजेक्ट राबविण्यात आले.शालेय गरजु मुलींसाठी मोफत सायकल वाटप करण्यासाठी अध्यक्षा मानसी चन्नावार यांच्या आईंनी १५००० रुपये देणगी दिली व सात मुलींना इयत्ता नववी व 10 वी मधील विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट प्रमुख होत्या सौ. मीरा चंबुले, उदगीर इनरव्हीलच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे प्रत्येक प्रकल्पाला सहकार्य केले. आणि कार्यक्रम यशस्वी केला.
