प्रभाग क्र. ४ मध्ये आगलावे यांच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे शिबिर
प्रभाग क्र. ४ मध्ये आगलावे यांच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे शिबिर
अहमदपूर (गोविंद काळे) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे, स्वीकारणे आणि लागलीच ऑनलाईन करणे याबाबतचे शिबिर प्रभाग क्रमांक चार, पंचमुखी हनुमान मंदिर, नागेश कॉलनी अहमदपूर येथे माजी नगरसेविका कमलबाई आगलावे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रभागातील गोर गरीब महिलांनी तब्बल २०० फॉर्म भरून लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मोफत लाभ घेतला आहे. या कामासाठी अंगणवाडी कर्मचारी श्रीमंती तांबरे, नगरपरिषद कर्मचारी शेवाळे, शिवराम सोलापूरे व आदित्य ससाने, सिद्धेश्वर देवकते आदी कर्मचारी यांनी उपस्थित राहुन योग्य ते सहकार्य केले आहे. शिबिर हे मोफत अर्ज स्वीकारणे व भरणेसाठी घेण्यातआले होते. सदरील शिबीर सामाजिक कार्यकर्ते बालाजी प्रकाश पाटील (आगलावे) माजी बांधकाम सभापती कमलाबाई प्रकाश आगलावे यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
