ईच्छा असूनही पालखी सोहळ्यात सहभागी न होऊ शकलेल्यासाठी,अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन तर्फे आषाढी महोत्सवात विविध कार्यक्रम आणि स्पर्धा

0

उदगीर (एल.पी.उगीले) :- ईच्छा असूनही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत, अशा वारकऱ्यांसाठी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन मार्फत विठू नाम सोहळा आयोजित केला आहे.
ललित भवन मंगल कार्यालय येथे बुधवार दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त आयोजित आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सकाळी नऊ ते बारा ” ऐकावा विठ्ठल, पहावा विठ्ठल” अभंग वाणी सादर करण्यात येणार आहे. तर दुपारी १२ ते ४ पहिली ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यासाठी वारकरी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . सायंकाळी या स्पर्धेतील बाल वारकऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमात भक्तासाठी उपवासाच्या फराळाची व्यवस्थाही केलेली आहे . या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविक भक्तासह बाल वारकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!