जगातील दिगजांसोबतच उदगीरच्या प्रतिनिधीनेही अंबानी परिवारास दिल्या शुभेच्छा !

0
जगातील दिगजांसोबतच उदगीरच्या प्रतिनिधीनेही अंबानी परिवारास दिल्या शुभेच्छा !

जगातील दिगजांसोबतच उदगीरच्या प्रतिनिधीनेही अंबानी परिवारास दिल्या शुभेच्छा !

उदगीर (एल. पी. उगिले) : देशातील ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला. या शुभविवाह प्रसंगी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी तथा महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शिल्पाताई बनसोडे यांनी अंबानी परिवाराला भेटून शुभेच्छा दिल्या.
या शाही विवाह सोहळ्यात जगभरातील ख्यातनाम उद्योगपती, राजकारणी उपस्थित होते. अंबानी परिवाराशी क्रीडामंत्री म्हणून ना. संजय बनसोडे यांचे जवळीक संबंध प्रस्थापित झाल्यामुळे अंबानी परिवारांनी अट्टाहासाने ना. संजय बनसोडे यांना निमंत्रित केले होते. त्यांच्या निमंत्रणाचा मान राखून सहपरिवार जाऊन संपूर्ण उदगीर विधानसभा मतदार संघाच्या वतीने वधू-वरास शुभ आशीर्वाद दिला. याप्रसंगी उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी व अंबानी कुटुंबीय उपस्थित होते.
मुंबई येथील जिओ वर्ल्ड सेंटर, बी.के.सी. येथे हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, विविध राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री आणि मान्यवरांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी उदगीरकरांना अभिमान वाटावा असा सन्मान ना. संजय बनसोडे यांचा अंबानी परिवारांच्या वतीने करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!