मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोफत कॅम्प, 328 महिलांनी घेतला लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोफत कॅम्प, 328 महिलांनी घेतला लाभ
उदगीर (एल.पी.उगीले): “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना उदगीर शहरातील प्रत्येक प्रभागात, वार्डात प्रत्येक भगिनी पर्यंत पोचली पाहिजे. या उद्देशाने क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा पालकमंत्री परभणी यांच्या कल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहराच्या वतीने शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ व शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे यांच्या सूचनेनुसार उदगीर शहरातील प्रभाग 19 मध्ये मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करत असतानाच ही योजना प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असताना येणाऱ्या अडचणी च्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन अर्जही भरण्यात आले.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली राज्यातील सबंध 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला भगिनींसाठी महत्त्वाकांशी ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उदगीर शहरातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोचली पाहिजे, या हेतूने नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 19 मध्ये दोन ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान नगर व स्कायलाईन इंग्लिश स्कूल येनकी- मानकी रोड, उदगीर येथे मोफत फॉर्म व नाव नोंदणी करण्यात आली. यात 328 महिला भगिनींनी या कॅम्पचा,शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक घोरपडे, बालाजी तेलंगे, प्रा. जावेद शेख, सुधाकर सूर्यवंशी, मनीष मुळे, संरक्षण अधिकारी महिला बाल विकास उदगीर शेख नसीर, हरिदास श्रीडोळे, सय्यद फैजान, रेहान सय्यद, अंगणवाडी सेविका छाया दिगंबर मोरे, कविता बालाजी पाटील, विजया देशमुख, कविता म्हेत्रे, अंगणवाडी मदतनीस मीना माणिकराव तेंद्रे यांच्यासह या परिसरातील युवा कार्यकर्ते व महिलांनी अथक परिश्रम घेतले आहे.
