अहमदपूर येथे बालाघाट विधी महाविद्यालयास शासनाची मंजुरी
अहमदपूर येथे बालाघाट विधी महाविद्यालयास शासनाची मंजुरी
अहमदपूर (गोविंद काळे) : श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडूरकी तर्फे बालाघाट विधी महाविद्यालय, रुद्धा ता अहमदपूर जी लातूर येथे सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.
या बालाघाट विधी महाविद्यालयात शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे यामुळे अहमदपूर, चाकूर, रेनापुर, लोहा, उदगीर, जळकोट या परिसरातील विधी अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एल.एल.बी. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासह मान्यता मिळाली आहे.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून एल.एल.बी. तीन वर्षी या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर व एलएलबी सी ई टी 3 वर्ष- 2024 परीक्षेत पात्र असणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक नवीन संधी निर्माण झाली आहे त्यामुळे भागातील विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बालाघाट विधी महाविद्यालयात अंतिम मान्यता मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे संस्था अध्यक्ष गणेश हाके व संस्था सचिव रेखाताई हाके यांनी आभार मानले.
