शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आषाढी एकादशी निमित्त भाविकांना फराळाचे वाटप

0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आषाढी एकादशी निमित्त भाविकांना फराळाचे वाटप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आषाढी एकादशी निमित्त भाविकांना फराळाचे वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी एकादशी निमित्त भाविकांना फराळाचे वाटप करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी मनोकामना करण्यात आली. आज आषाढी एकादशीनिमित्त अहमदपूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात शिवसेना ( ठाकरे ) लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने येणाऱ्या व पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना शाबु, केळी फराळाचे वाटप जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. भाविकांना फराळाचे वाटप केल्याबद्दल भाविक संतोष हाळणे यांच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, तालुका संघटक बाजार समितीचे संचालक प्रा.संतोष रोडगे,नगरसेवक संदीप चौधरी, सह्यक्क वाहतूक अधीक्षक देशमुख, सह्याक्क कार्यशाळा अधीक्षक कोकाटे,उपतालुकाप्रमुख गणेश माने,शहर प्रमुख शिवा कासले ,बाळासाहेब पडीले, माधव कासले,कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, प्रतीक रेड्डी,उपशहर प्रमुख,शिवा भारती,उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे, तालुका सहसचिव पद्माकर पेंढारकर, दामोदर घोरपडे, युवा सेना शहर प्रमुख लहू वाळके,गणेश चव्हाण,गणेश राठोड,नितीन मस्के,मारोती अरदवाड,अखिल शेख, श्याम गलाले,नागेश गोडबोले, राहुल गिरी, रमजान शेख आदी शिवसैनिक सह भाविक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!