माऊली विद्या भवन ची आषाढी दिंडी संपन्न

0
माऊली विद्या भवन ची आषाढी दिंडी संपन्न

माऊली विद्या भवन ची आषाढी दिंडी संपन्न

लातूर (प्रतिनिधी) – पायाभूत विकासाचा शैक्षणिक प्रकल्प म्हणून परिचित असलेल्या माऊली विद्या भवन व माऊली शिशुविहार सेमी इंग्लिश बोधे नगर लातूर येथील विद्यार्थ्यांनी आज बुधवार दि.17/07/2024 रोजी आषाढी दिंडी काढली. पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत होय. त्या परंपरेची संस्काराची जाणीव व महत्त्व बालवयापासून होण्यासाठी दरवर्षी विद्यालयात आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात येते. वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकले विद्यार्थी पालकांसमवेत सहभागी झाले होते विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चा जय घोष प्रत्येकाच्या मुखी होता. टाळ मृदंगाची मंजूळ ध्वनी सर्वांच्या कानावर पडत होती. या दिंडीमध्ये सर्वजण मंत्रमुग्ध होऊन चालत होते.
या नयनरम्य सोहळ्यामध्ये
सूर्यवंशी श्रेयस विठ्ठल ,रुक्मिणीची कोळी समृद्धी, कांबळे सार्थक तुकाराम व कांबळे प्रणव संत ज्ञानेश्वराच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
अविर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, या भक्तीमय गीतावर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आकर्षक व बहारदार असे नृत्य सादर करत सर्व उपस्थितांची मने जिंकली. घरापुढे दिंडी आल्यानंतर परिसरातील महिला भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा करून पालखीचे दर्शन घेतले. दिंडी ची सांगता वारकरी भजनी मंडळाच्या हस्ते विठ्ठलाच्या आरतीने करण्यात आली व त्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसाद वाटपही करण्यात आले.
या दिंडीमध्ये संस्था सचिव श्री गंगाधर आरडले सर, कोषाध्यक्ष श्री तानाजी बेवनाळे पाटील सर, प्राचार्या सौ कविता आरडले मॅडम , उपप्राचार्या काळे भाग्यश्री मँडम, परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री ऋषीकेश पाटील सर, मुख्याध्यापक श्री राठोड सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती चेगे मॅडम, संपूर्ण शिक्षक वृंद, कर्मचारी, पालक सदस्य श्री.लक्ष्मण घुटे व मोठ्या संख्येने पालक वर्ग, विद्यार्थी,भजनी मंडळ श्रीम.जोशी काकू व त्यांचा चमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तसेच दिंडीच्या यशस्वीतेसाठी सर्व कॅप्टन्स व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!