आषाढी एकादशी निमित्त सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे पालखी सोहळा
आषाढी एकादशी निमित्त सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे पालखी सोहळा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मोर्य इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढी दिंडी काढली. पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत होय. त्या परंपरेची संस्काराची जाणीव व महत्त्व बालवयापासून होण्यासाठी दरवर्षी विद्यालयात आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात येते. वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकले विद्यार्थी पालकांसम वेत सहभागी झाले होते विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चा जय घोष प्रत्येकाच्या मुखी होता. टाळ मृदंगाची मंजूळ ध्वनी सर्वांच्या कानावर पडत होती. या दिंडीमध्ये सर्वजण मंत्रमुग्ध होऊन चालत होते.
अविर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, या भक्तीमय गीतावर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आकर्षक व बहारदार असे नृत्य सादर करत सर्व उपस्थितांची मने जिंकली. परिसरातील महिला भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा करून पालखीचे दर्शन घेतले. दिंडी ची सांगता वारकरी भजनी मंडळाच्या हस्ते विठ्ठलाच्या आरतीने करण्यात आली व त्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसाद वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष गणेश दादा हाके, संस्था सचिव रेखाताई हाके, संचालिका शिवालिकाताई हाके, संचालक कुलदीप हाके, प्राचार्य हरिदास सर हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
