औसा आडत असोसिएशन पदाधिकाऱ्यांचा राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार

0
औसा आडत असोसिएशन पदाधिकाऱ्यांचा राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार

औसा आडत असोसिएशन पदाधिकाऱ्यांचा राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार

औस (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत असोसिएशनची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आडत असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवलिंगाप्पा औटी, उपाध्यक्षपदी गोविंद बापू दळवे, प्रा. फारूक शेख, सचिव पदी महेश जाधव, कोषाध्यक्षपदी परमेश्वर भोसले यांची निवड करण्यात आली आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या दहा, पंधरा वर्षात अतिशय चांगली म्हणून जिल्हात नंबर तीनची बाजार समिती म्हणून नावलौकिक मिळवलेली आहे. अतिशय पारदर्शकपणे बाजार समितीचा कारभार असल्यामुळे येथील शेतकरी, अडते, व्यापारी, खरेदीदार, हमाल, गुमास्ता एका समन्वयाने काम करून शेतकऱ्याचे हित जपण्याचे काम करतात. त्यामुळे आडत असोसिएशन महत्त्वाची मोलाची भूमिका बजावते.
या सत्कारावेळी शिवसेना शहर प्रमुख सुरेश भुरे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, राजाभाऊ भणगे, राहुल साळुंके, शरणाप्पा सड्डू, विजयकुमार राचटे, सुरेश मुसळे, किशोर भोसले, बाबा यादव, विश्वराज औटी, महादू कुचमे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!