राज्य ग्रामसेवक संघटनेचा बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र देण्यास नकार, बांधकाम मजूर विविध लाभापासून वंचित राहणार
राज्य ग्रामसेवक संघटनेचा बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र देण्यास नकार, बांधकाम मजूर विविध लाभापासून वंचित राहणार
जिल्हाधिकारी याकडे लक्ष घालुन तोडगा काढण्याची मजूर संघटनेची मागणी
मजुरांना वाऱ्यावर सोडण्याचे शडयंत्र
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ए (136) अध्यक्ष,सरचिटणीस यांनी संपूर्ण राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मागणी होत असलेल्या बांधकाम कामगार व इतर कामगार यांनी मागील वर्षात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट नकार प्रधान सचिव कमगार विभाग मुंबई यांना निवेदना द्वारे दिलेला आहे, ग्रमसेवक संघटनेचे म्हणणे असे आहे की शासन परिपत्रकानुसार हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना असून त्यांनी देण्यास टाळाटाळ करून गोरगरीब कामगारांचे दिशाभूल करीत ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी त्यांच्याकडे बोट दाखवत असल्यामुळे ग्रामसेवक यांना अधिकार नसताना काही राजकीय दबावापोटी खोटे प्रमाणपत्र देण्यास भाग पाडत आहेत. ग्रामसेवक यांना ग्रामीण भागामध्ये दैनंदिन कामकाज करीत असताना सर्वसाधारण गरीब कामगारांसोबत वादाला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत वरिष्ठांकडे वारंवार मार्गदर्शन व पत्र व्यवहार करून सुद्धा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा वरिष्ठांच्या व्यवहारास कंटाळून काही ग्रामसेवक बांधवांनी असे प्रमाणपत्र दिले असता त्यांच्यावर पोलीस कार्यवाही होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेने बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्यास एका निवेदनानुसार स्पष्ट नकार दिलेला आहे मा. प्रधान सचिव, कामगार विभाग मुंबई यांना निवेदना द्वारे तसे कळविले असल्याचे ग्रामसेवक ईश्वर मुर्के यांनी सांगितले आहे,परंतु असे प्रमाणपत्र न दिल्याने गोर गरीब मजूर बांधकाम कामगार शासनाच्या विविध योजना व लाभापासून वंचित राहणार आहेत तरी याकडे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन तोडगा काढावे अन्यथा कामगार मजुरांचा अंत पाहू नये संयम सुटला तर प्रशासनाला चालती भुई कमी पडेल असा इशारा मजूर संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे
