जातीयवादी सरकारच्या निषेधासाठी गुरुवारी समाजवादी विचारधारेच्या नागरिकांचा मोर्चा – निवृत्ती सांगवे

0
जातीयवादी सरकारच्या निषेधासाठी गुरुवारी समाजवादी विचारधारेच्या नागरिकांचा मोर्चा - निवृत्ती सांगवे

जातीयवादी सरकारच्या निषेधासाठी गुरुवारी समाजवादी विचारधारेच्या नागरिकांचा मोर्चा - निवृत्ती सांगवे

उदगीर (एल. पी. उगिले) : कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या छोट्या वस्ती व गजापूर मुसलमान वाडी गावात गरीब मुस्लिम कुटुंबावर, लहान लहान मुलावर अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करून व अत्याचार करून, धार्मिक स्थळावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व हा हल्ला झाल्यानंतरही हल्लेखोरांना पाठीशी घालणाऱ्या जातीयवादी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी समाजवादी विचारधारेच्या सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांना सोबत घेऊन गुरुवारी उदगीर शहरात मोर्चा काढून निषेधाचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा पॅंथर नेते निवृत्तीराव सांगवे यांनी दिली आहे. अशा पद्धतीचे निवेदन उदगीर तहसील कार्यालय येथे देण्यात आले आहे. तहसील कार्यालयासमोर ही निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्यात जखमी झालेल्या जनतेला तात्काळ संरक्षण द्या, अशी मागणी करत पवित्र कुरआनची विटंबना केल्याचाही निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय दलित अधिकार मंच सोबतच एम आय एम, भारतीय दलित पॅंथर आणि दलित मुस्लिम ऐक्य परिषद चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदगीर शहरातील डॉ. जाकिर हुसेन चौक (उमा चौक) येथून या समविचारी समाजवादी विचारधारेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने तहसील कार्यालय येथे रॅली काढून तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली ही घटना समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी आहे. भविष्यात समाजामध्ये शांतता राहण्याच्या दृष्टीने या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व घटकावर कठोर कायदेशीर करावी, तसेच या भ्याड हल्ल्यात ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्तांना महाराष्ट्र शासनाकडून ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी. तेथील मुस्लिम समाज व त्यांचे धार्मिक स्थळे यांना संरक्षण देण्यात यावे. अशीही प्रमुख मागणी पॅंथर नेते निवृत्तीराव सांगवे यांनी केली आहे. याप्रसंगी एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष ताहेर हुसेन, सनाउल्लाह खान, मुक्रम जागीरदार, बहुजन विकास आघाडीचे संजय कुमार कांबळे, माजी नगरसेवक साबेर पटेल, विकास कांबळे, संजय राठोड यांच्यासह राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!