अहमदपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ६० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी – आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना यश

0
अहमदपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ६० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी - आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना यश

अहमदपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ६० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी - आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना यश

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या अतंर्गत मुख्यमंत्री ग्राम रस्ते योजना टप्पा-२ मधून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्ती
व विकास कामांसाठी ६० कोटी १० लक्ष रुपयांची नुकतीच मंजुरी देण्यात आली असून, या कामांना मंजुरी व निधी मिळण्यासाठी आ.बाबासाहेब पाटील यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

अहमदपूर तालुक्यातील राज्य महामार्ग – २४९ शिरूर ताजबंद चोबळी माकणी- उमरगा येल्लादेवी खरबवाडी – ते तालुका सरहद्द रस्ता एकूण लांबी १०.१५० किमी. रक्कम १३ कोटी ४१ लक्ष रुपये, राज्य महामार्ग -५६ धानोरा – हिप्पळगाव – हाडोळती – आनंदवाडी तालुका सरहद्द रस्ता. एकूण लांबी ३.१५० किमी, रक्कम ४ कोटी ४२ लक्ष रुपये, रामा-५६ ते लांजी – तांबटसावंगी प्रजिमा -२१ विळेगाव – मानखेड – केंद्रेवाडी अंधोरीरस्ता. एकूण लांबी १५.७२० किमी. रक्कम २३ कोटी ४३ लक्ष रुपये. चाकूर तालुक्यातील प्रजिमा ३० टाकळगाव रस्ता. एकूण लांबी ४.१०० किमी.रक्कम ५ कोटी ५२ लक्ष रुपये, सुगाव ते आष्टा राममा-६३ रस्ता एकूण लांबी ७.२३० किमी, रक्कम १३ कोटी ३० लक्ष रुपये आदी एकूण ५ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटी १० लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. आ. बाबासाहेब पाटील यांनी सातत्याने शासन स्तरावर या कामांचा पाठपुरावा
केला होता. आता या सर्व कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच निश्चित कालावधीत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आ. बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारामुळे अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांची स्थिती सुधारून नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या कामांना मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, कार्यकारी अभियंता खैराती व उपअभियंता डी. आर. मुकदम यांचे आभार आ. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हा प्रकल्प केवळ रस्ते दुरुस्तीपुरता मर्यादित नाही, तर तो ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. या कामांमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यवसायिक व सामान्य नागरिक यांना आपले दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल, प्रवासाच्या वेळेची बचत होईल व वाहतुकीच्या सुविधा सुधारतील. या रस्त्यांच्या विकासामुळे मतदारसंघात ग्रामीण आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती होणार आहे, अशी प्रतिक्रिया आ. बाबासाहेब पाटील यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!