आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बळीराम पवार यांचा सत्कार
आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बळीराम पवार यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : उत्थान फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बळीराम पवार यांना आंतरराष्ट्रीय वुमन्स अचिव्हर अवॉर्ड आणि नॅशनल एज्युकेशन अवार्ड या दोन पुरस्कारांनी सन्मानित केल्याबद्दल त्यांचा येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, डॉ. बळीराम पवार यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाने अमिट ठसा उमटविला आहे. ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण रक्षण असो की वृक्ष लागवड असो प्रत्येक क्षेत्रात डॉ. बळीराम पवार हे पुढेच असतात. त्यांच्या कार्याची सुयोग्य दखल दिली येथील उत्थान फाउंडेशन या संस्थेने घेतली आहे, याबद्दलचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी डॉ. बळीराम पवार यांना पुढील कार्यासाठी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डाॅ. बळीराम पवार म्हणाले की, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर हे माझ्या नेहमीच पाठीशी असून या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी मला सातत्याने प्रोत्साहित केले आहे. आपण यापुढेही सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहो असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, डॉ. मारोती कसाब, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचिन गर्जे, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर हभप डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
