महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापन दिन साजरा
निलंगा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 62 वा वर्धापन दिन शिक्षक समिती तालुका शाखा निलंगा लातूर यांनी 22 जुलै 2024 रोजी निलंगा येथे वर्धापन दिन वृक्षारोपण करून साजरा केला सदरील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी सोपान अकेले ,गटशिक्षणाधिकारी गायकवाड सुरेश, विस्तार अधिकारी संतोष स्वामी, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके नेते बालाजी येलीकर ,कन्या प्रशाला मुख्याध्यापक सरस्वती नागमोडे हे उपस्थित होते.वृक्षारोपणाचा कार्यक्रम कन्या प्रशाला निलंगा येथे संपन्न झाला.. कन्या प्रशाला निलंगा,गटसंधान केंद्र निलंगा तसेच पंचायत समिती निलंगा येथे गटविकास आधिकारी सोपान आकिले साहेब, सुरेश जाधव गटशिक्षमाधिकारी यांच्या तर्फे वृक्ष लागवड करण्यात आली. शिक्षक समितीचे संस्थापक कै भा.वा शिंपी यांच्या प्रतिमेची पुजुन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संजय कदम यांनी केले शिक्षक समितीच्या चळवळीचा इतिहास संतोष स्वामी यांनी मांडले आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके यांनी केले महाराष्ट्रातील शिक्षक बालक पालक व शिक्षण यांची पक्षपाती असलेली ही शिक्षकाची समिती आज 63 व्या वर्षात पदार्पण करत असून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम लातूर जिल्ह्यात व महाराष्ट्रात साजरे होतात. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष संजय कदम सरचिटणीस गणेश गायकवाड कार्याध्यक्ष धुमाळ विष्णुकांत, सुनील टोम्पे कालिदास बिराजदार, सहदेव माने,,दरेकर सत्यप्रकाश पाटील बी एम ,जे के वाघमारे, सुरेश जाधव, धनाजी आर बी, इनामदार के जे,वसंत पाटील,सुर्यवंशी आर एस, भास्कर सोळुंके प्रशांत मारगने ,राजू कोंडावार, भाले डिगु , संगनाळे श्रीमंत, अतुल देसमुख, सचिन डोईजोडे,मदुकर सोनवने , दुड्डे किशोर ,महिला प्रमुख सुरेखा टिके, बालिका धानोरे, रेखा कदम, बोंडगे सुंदर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
